धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मापासून ते १६ वर्ष वयापर्यंतच्या लहान बालकांमध्ये शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी तथा कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपचार, त्वचेची कांती वाढविण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोफत आयुर्वेदिक सुवर्णप्राशन (बाल रसायन घृतपान) एक आयुर्वेदिक लसीकरण शिबीर धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज येथे पुष्य नक्षत्र दिवस रविवार, दिनांक ११ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत आयोजीत केले होते. त्यास प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. यावेळी ४११ बालकांना सुवर्णप्राशन करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धन्वंतरी रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर रोटरी सचिव रो. रविंद्र हसरगुंडे उपाध्यक्षा रो. मंगला विश्वनाथे, रो. विजयकुमार पारसेवार, रो. ज्योती डोळे, रो. रामदास जळकोटे, रो. राहुल मुचेवाड सह डॉ. अस्मिता भद्रे, डॉ. उषा काळे व इतर डॉक्टर मंडळी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. आभार लसीकरण संचालिका रो. अन्नपूर्णा मुस्तादर यांनी मानले.

या शिबीरस्थळी तहसीलदार रामेश्वर गोरे सह अनेक प्रशासकीय अधिकारी स्वतः आपल्या पाल्यास घेऊन येऊन सुवर्णप्राशन संस्कार केले.