आयुष मंत्रालय,भारत सरकार आणि भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद,नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशानुसार कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निरोगी,अन्य विविध आजार असणाऱ्या व्यक्तींना व तसेच कोरोना संशयित रुग्णांना सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेद शास्त्रातील विविध संदर्भांचा आधार घेऊन आयुष काढा(औषधी)तयार करण्यात येत आहेत.
विविध संसर्गजन्य आजार व आतंकप्राय कारणांतर्गत वर्णित व्याधींचा प्रसार व त्याचे शरीरावर दुष्परिणाम टाळण्यासाठी अनेक औषधांचे उदाहरणार्थ अश्वगंधा चूर्ण,शतावरी चूर्ण,पिंपळी चूर्ण,गुडूची चुर्ण,यष्टिमधु चूर्ण,सितोपलादी चूर्ण,तालिसादी चूर्ण,सूक्ष्म त्रिफळा चूर्ण,त्रिकटू चूर्ण,कंटकारी चूर्ण,वासा चूर्ण,नागरमोथा चूर्ण,दालचिनी चूर्ण,त्रिभुवनकिर्ती रस,नाग गुटी,श्वासकुठार रस,लक्ष्मीविलास रस यासारख्या विविध औषधींचे वेगवेगळे संदर्भ आयुर्वेदशास्त्रात वर्णन करण्यात आलेले आहेत.
यापैकीच काही औषधांचे करून तीन मिश्रण बनवून त्यापैकी पहिले मिश्रण सकाळी; दुसरे मिश्रण दुपारी व तिसरे मिश्रण संध्याकाळी या पद्धतीने तीन वेळा संबंधित व्यक्तींनी त्यांच्या घरीच काढे तयार करून घ्यावे यासाठी धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 मे 2020 ते 13 मे 2020 या कालावधीत तीन दिवसीय शिबिर धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज चारिटेबल हॉस्पिटल,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर,जिल्हा:-लातूर येथे आयोजित शिबिरात देण्यात येणार आहेत.
या शिबिरामध्ये एका कुटुंबातील सहा व्यक्तींसाठी सात दिवस पर्यंत पुरेल एवढे रोगप्रतिकारक क्षमता वृद्धीकारक आयुर्वेदिक काढ्याचे(औषधीचे)मिश्रण अत्यल्प दरात म्हणजेच केवळ दीडशे(एकशे पन्नास)रुपयात देण्यात येणार आहे.
सदरील जमा झालेली रक्कम सुद्धा दिनांक 15 मे 2020 रोजी प्रधानमंत्री केअर फंड,मुख्यमंत्री सहाय्यता निधी व स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार उपयोगात आणली जाणार आहे. तरी या शिबिराचा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी  व  ज्यांना श्वसनवह संस्थानाचे  आजार आहेत त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील,सचिव रो.मंगला विश्वनाथे, प्रोजेक्ट चेअरमन रो.डाॅ.संग्राम पटवारी,रो.डाॅ.एस.आर.श्रीगिरे,रसशास्त्र विभागप्रमुख डॉ.बालाजी कट्टेवार,रो.डाॅ.विजय कवठाळे,रो.डाॅ.संगमेश्वर दाचावार,रुग्णालय उपाधीक्षक डाॅ.उषा काळे,रुग्णालय समिती प्रमुख डाॅ.नारायण जाधव,रुग्णालय समिती समन्वयक डाॅ.मंगेश मुंढे,स्वस्थवृत्त विभागप्रमुख डाॅ.अविनाश जाधव,डाॅ.सचिन टाले यांनी केले आहे.