कोवीड-19 या विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर,जिल्हा:-लातूर येथे उद्या गुरुवार,दिनांक:-09 सप्टेंबर 2021 पासून कोवीड-19 लसीकरण केंद्र सकाळी दहा ते दुपारी दोन यादरम्यान दररोज सुरु असणार आहे.सदरील कोवीड लसीकरण शासकीय सुट्टीचे दिवस व रविवारी बंद राहील किंवा संबंधित अधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसारच सुरू ठेवण्यात येईल.
उदगीर व परिसरातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या कोवीशिल्ड किंवा कोवॅक्सीन लसीचा नियमानुसार पहिला किंवा दुसरा डोस घ्यावा असे आवाहन धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील,सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शशिकांत देशपांडे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बिरादार,उदगीर येथील लसीकरण मोहीमेचे नोडल ऑफिसर डाॅ.चंद्रशेखर रामशेट्टे तथा धन्वंतरी आयुर्वेदिक काॅलेजचे वैद्यकीय उपाधिक्षक डॉ.उषा काळे,डॉ.नारायण जाधव,डाॅ.मंगेश मुंढे,डाॅ.नामदेव बनसोडे यांनी केली आहे.
संस्कृत सप्ताह समारोह (21/08/2021-27/08/2021) विविध कार्यक्रमांद्वारे उत्साहात साजरा
संस्कृत सप्ताह समारोह उदघाटन -उदघाटक- प्राचार्य डाॅ.दत्तात्रय पाटील -दि. 21/08/2021
संस्कृत सप्ताह समारोह – व्याख्यान – प्रा. विनायक गरूड(मा.अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालय आष्टा) दि. 22/08/2021
संस्कृत सप्ताह समारोह – श्लोक पाठांतर स्पर्धा – दि. 23/08/2021
संस्कृत सप्ताह समारोह – व्याख्यानमाला प्रा.डाॅ.सुचिता पांडे(ASS Ayurved college Nashik) प्रा.डाॅ.मधुरा कुलकर्णी(टिळक आयुर्वेद महाविद्यालय पूणे) प्रा.डाॅ.सरोज तिरपूडे(महात्मा गाधी आयुर्वेद महाविद्यालय सारोडा वर्धा) दि. 26/08/2021
संस्कृत सप्ताह समारोह – व्याख्यानमाला प्रा.अनघा कुलकर्णी(SNBT Ayurved college Igatpuri Nashik) प्रा.डाॅ.गजानन भोपी(आयुर्वेद महाविद्यालय पुसद) प्रा.डाॅ.शितल पाटील( आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी) दि. 27/08/2021
II BAMS (2017, 2012 & 2010) Summer 2021 Exam appear Students are notified that their academic term for III BAMS (2017, 2012 & 2010) will start from 1st August 2021 as per MUHS circular no. 41/2021 dated 20th Aug 2021
III BAMS (2017, 2012) Summer 2021 Exam appear Students are notified that their academic term for IV BAMS (2017, 2012) will start from 1st August 2021 as per MUHS circular no. 41/2021 dated 20th Aug 2021
One day International Webinar organized on Friday;13th August 2021 on the auspicious occasion of CHARAK JAYANTI-2021. This International webinar is endorsed & affiliated by Directorate of AYUSH, Government Of Maharashtra, Mumbai; Maharashtra University of Health Sciences, Nashik & Maharashtra Council of Indian Medicine, Mumbai.
-:Themes Of The International Webinar in Context of Charak Samhita:- (1) Ayurvedic Management Of The Nutritional Disorders. (2) Ayurvedic Management Of The Psychiatric Disorders. (3) Diagnostic Methodology Of The Diseases in Ayurveda. (4) Ayurvedic Management Of The Lifestyle Disorders (Diabetes; Obesity) (5) Ayurvedic Management Of Autoimmune (Skin/Endocrine)Disorders. (6) Ayurvedic Rejuvenation Therapy & Disease Prevention. (7) Ayurvedic Vyadhikshamatva & Prakrutisthapana. (8) Purvakarma, Panchakarma & allied Therapies in Clinical Practise. (9) Ayurvedic Management Of The Musculoskeletal Disorders.
(10) Role of Ayurveda in National Health Programme.
-:(1) RULES & REGULATIONS FOR FREE PAPER PRESENTATION ON ABOVE THEME:- Open for UG/PG & Ph.D Scholars of Ayurveda Colleges. Submit abstract of Presentation topic.(Maximum 300 words) through E-mail.Best Ten papers will be published in Index journal.
Candidate should ensure details regarding their Qualification, Phone Number & E-mail.
-:(2) RULES & REGULATION FOR FREE POSTER PRESENTATION ON ABOVE THEME :- *Open for UG & PG Students of Ayurveda. Dimensions of Poster – 3ft wide and 4ft height. Poster organization– Poster can be organized into Various subparts as per your abstract(Introduction Aims & objective,Material & methods,Result and conclusion)
The poster orientation – ‘Portrait Position (long dimension is vertical).
-:(3) RULES & REGULATION FOR FREE ESSAY COMPETATION ON ABOVE THEME :- *Open for UG & PG Students of Ayurveda. *Essay should e healthy hand written or typed on one side of white A4 size paper, Name of candidate & Address should be mentioned on top of first page.
Essay must be Maximum up to 10 pages & should be submitted in PDF format.
Last date of Acceptance of Paper Presentation,Poster presentation & Essay competition is:-Sunday; 10 August 2021 till 05:00 pm.
-:Registration Details:- We would like to bring to your notice that Organizing committee has decided not to charge any fees for REGISTRATION to the delegates for this webinar & no charges for the participation in paper presentation, poster presentation & essay compitation.Hence Registration is Free & open for All Teaching staff,UG & PG Student,Practitioners,Medical officers.We humbly request you to confirm your registration for this International webinar till 12 August 2021.
Note:- E-certificate will be sent only after submission feedback form by the Registered Participants.
It is jointly organised in collaboration with various organizations such as Association of Management of Ayurved Medical Colleges of Maharashtra;Govt-Aided Ayurved Colleges Management And Principal Association,Maharashtra;Vishwa Ayurved Parishad,Maharashtra; National Integrated Medical Association(NIMA),New Delhi; Ayurved Vyaspeeth,India;B.A.M.S.Graduates Association,Maharashtra;Astitwa Parishad,Maharashtra;Maharashtra Ayurved Mahasammelanand N.A.S.Y.A,Maharashtra.
This webinar is a scientific debate aimed for updating knowledge, sharpening Skills & achieving expertise.
जागतिक महामारी सदृश्य कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऐच्छिक रक्तदात्यांची संख्या अत्यंत कमी झाली असून विविध शस्त्रक्रिया,डिलिव्हरी,अपघातजन्य रक्तस्राव,अॅनिमिया,ईत्यादी प्रसंगी रक्ताची मागणी मात्र मोठय़ा प्रमाणावर वाढलेली आहे.
रक्ताचा तुटवडा भरून काढावा व रक्त न मिळाल्यामुळे होणारी जीवितहानी किंवा अन्य दुष्परिणाम टाळावे या उद्देशाने सद्यस्थितीत सुरु असलेल्या स्व.जवाहरलाल यांच्या जयंतीनिमित्त सामान्य रुग्णालय,उदगीर;लोकमत समूह;धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,उदगीर;मातृभूमी महाविद्यालय,उदगीर; आर्ट ऑफ लिविंग,उदगीर व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,उदगीर-आगार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक:-15 जुलै 2021,गुरुवार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्थळ:- (1) धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,देगलूर रोड,उदगीर,जि:-लातूर (2) बस स्टँड, शिवाजी चौक,उदगीर
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब जाधव,उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी व प्रसिद्ध ह्दयरोग तज्ज्ञ डाॅ.रामेश्वर बाहेती यांच्या हस्ते तथा अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
तरी ईच्छुक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवाविण्याकरिता रक्तदान समन्वय समितीच्या डाॅ.संगीता सौंदळे(9881684585),डाॅ.ज्योत्सना डावरे(9423399238),सौ.उषा उस्तुरे(9175884596),डाॅ.महेश वाघमारे(9405049855),डाॅ.वैभव बिरादार(9890273347), श्रीनिवास सोनी(9421485971), डॉ धनाजी कुमठेकर(7972137906),श्री.सिमंतकर श्रीपाद(9834668027),रसूल पठाण(9764160180),दयानंद बिरादार(9028582999)यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार,धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील,मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे,आगारप्रमुख यशवंत कानतोंडे,लोकमत तालुका प्रतिनिधी व्ही.एस.कुलकर्णी,पत्रकार विनायक चाकुरे,डाॅ.उषा काळे,डाॅ.नारायण जाधव,डाॅ.मंगेश मुंढे,डाॅ.नामदेव बनसोडे,डॉ.नम्रता कोरे यांनी केले आहे.
धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मापासून ते १६ वर्ष वयापर्यंतच्या लहान बालकांमध्ये शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी तथा कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपचार, त्वचेची कांती वाढविण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोफत आयुर्वेदिक सुवर्णप्राशन (बाल रसायन घृतपान) एक आयुर्वेदिक लसीकरण शिबीर धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज येथे पुष्य नक्षत्र दिवस रविवार, दिनांक ११ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत आयोजीत केले होते. त्यास प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. यावेळी ४११ बालकांना सुवर्णप्राशन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धन्वंतरी रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर रोटरी सचिव रो. रविंद्र हसरगुंडे उपाध्यक्षा रो. मंगला विश्वनाथे, रो. विजयकुमार पारसेवार, रो. ज्योती डोळे, रो. रामदास जळकोटे, रो. राहुल मुचेवाड सह डॉ. अस्मिता भद्रे, डॉ. उषा काळे व इतर डॉक्टर मंडळी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. आभार लसीकरण संचालिका रो. अन्नपूर्णा मुस्तादर यांनी मानले.
या शिबीरस्थळी तहसीलदार रामेश्वर गोरे सह अनेक प्रशासकीय अधिकारी स्वतः आपल्या पाल्यास घेऊन येऊन सुवर्णप्राशन संस्कार केले.
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल आणि इनरव्हिल क्लब उदगीर यांच्या वतीने धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल उदगीर येथील प्राचार्य दत्तात्रय पाटील व अनेक डॉक्टरांचा कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर्स डे निमित्त सत्कार करण्यात आला
भारतरत्न स्वर्गीय डॉ बी.सी.राॅय यांच्या जयंती निमित्त डॉक्टर्स डे व हरीत क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन हा दिनांक:-01 जुलै 2021 साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विविध चिकित्सा पद्धतींच्या(आयुर्वेद,अलोपॅथी, दंत चिकित्सक,होमिओपॅथी व युनानी)विविध संघटनांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि त्यासोबतच शासकीय व खाजगी सेवेत कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल उदगीर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.