धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे दि.११/०२/२०२१ रोजी हकीम अजमल खाॅन यांच्या 153 व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय युनानी दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून उदगीर येथील प्रसिद्ध युनानी चिकित्सक डॉ.अर्शिया कादरी उपस्थित होत्या.याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.बालाजी कट्टेवार,डॉ.मंगेश मुंढे,डाॅ.राजेंद्र धाटे,डाॅ.उषा काळे,डाॅ रविकांत पाटील डॉ.प्रशांत बिरादार,डॉ.नामदेव बनसोडे,डाॅ.योगेश सुरनर,डाॅ.धनराज एकुंडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस युनानीचे प्रसिध्द हकीम अजमल खान यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

डॉ.अर्शिया कादरी यांनी युनानी चिकित्सा पद्धतीचे रोगनाश व तसेच आरोग्य रक्षणात महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.आयुष अंतर्गत आयुर्वेद,योग,युनानी,सिध्द व होमिओपॅथी या पाच प्रकारच्या उपचार पध्दती जरी वेगळ्या असल्या तरी सर्व चिकित्सा पद्धतीचे प्रयोजन रुग्णास बरे करणे हेच आहे. कपिंग थेरपी व हिजामा इत्यादीचे युनानी चिकित्सा मधील महत्त्व विशद करताना डॉ.कादरी म्हणाल्या की आयुर्वेद व युनानी चिकित्सा पद्धतीमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साम्य आढळते.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील म्हणाले की प्रत्येक चिकित्सा पद्धतीची विशिष्ट बलस्थाने आहेत आणि सामाजिक आरोग्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.हकीम अजमल खान यांनी भारतात प्रचलित केलेल्या युनानी चिकित्सा पद्धतीने समाजोपयोगी चिकित्सा पद्धती म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे आणि अत्यल्प दरात दुर्धर आजारातुन रुग्णाची सुटका करण्यासाठी निश्चितपणे लाभ या चिकित्सा पद्धतीमुळे होतो त्याकरीता मोठ्या प्रमाणावर मोफत रोग निदान व उपचार शिबिरे आयोजित करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैभव बिरादर यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख फरनाझ यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी अंतिम वर्ष बी.ए.एम.एस चे विद्यार्थी तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी, वैद्यकीय अधिकारी व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.