कोवीड-19 या विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर,जिल्हा:-लातूर येथे उद्या गुरुवार,दिनांक:-09 सप्टेंबर 2021 पासून कोवीड-19 लसीकरण केंद्र सकाळी दहा ते दुपारी दोन यादरम्यान दररोज सुरु असणार आहे.सदरील कोवीड लसीकरण शासकीय सुट्टीचे दिवस व रविवारी बंद राहील किंवा संबंधित अधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसारच सुरू ठेवण्यात येईल.

उदगीर व परिसरातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या कोवीशिल्ड किंवा कोवॅक्सीन लसीचा नियमानुसार पहिला किंवा दुसरा डोस घ्यावा असे आवाहन धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील,सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शशिकांत देशपांडे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बिरादार,उदगीर येथील लसीकरण मोहीमेचे नोडल ऑफिसर डाॅ.चंद्रशेखर रामशेट्टे तथा धन्वंतरी आयुर्वेदिक काॅलेजचे वैद्यकीय उपाधिक्षक डॉ.उषा काळे,डॉ.नारायण जाधव,डाॅ.मंगेश मुंढे,डाॅ.नामदेव बनसोडे यांनी केली आहे.