जागतिक महामारी सदृश्य कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऐच्छिक रक्तदात्यांची संख्या अत्यंत कमी झाली असून विविध शस्त्रक्रिया,डिलिव्हरी,अपघातजन्य रक्तस्राव,अॅनिमिया,ईत्यादी प्रसंगी रक्ताची मागणी मात्र मोठय़ा प्रमाणावर वाढलेली आहे.

रक्ताचा तुटवडा भरून काढावा व रक्त न मिळाल्यामुळे होणारी जीवितहानी किंवा अन्य दुष्परिणाम टाळावे या उद्देशाने सद्यस्थितीत सुरु असलेल्या स्व.जवाहरलाल यांच्या जयंतीनिमित्त सामान्य रुग्णालय,उदगीर;लोकमत समूह;धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,उदगीर;मातृभूमी महाविद्यालय,उदगीर; आर्ट ऑफ लिविंग,उदगीर व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,उदगीर-आगार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक:-15 जुलै 2021,गुरुवार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
स्थळ:- (1) धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,देगलूर रोड,उदगीर,जि:-लातूर
(2) बस स्टँड, शिवाजी चौक,उदगीर

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब जाधव,उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी व प्रसिद्ध ह्दयरोग तज्ज्ञ डाॅ.रामेश्वर बाहेती यांच्या हस्ते तथा अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

तरी ईच्छुक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवाविण्याकरिता रक्तदान समन्वय समितीच्या डाॅ.संगीता सौंदळे(9881684585),डाॅ.ज्योत्सना डावरे(9423399238),सौ.उषा उस्तुरे(9175884596),डाॅ.महेश वाघमारे(9405049855),डाॅ.वैभव बिरादार(9890273347), श्रीनिवास सोनी(9421485971), डॉ धनाजी कुमठेकर(7972137906),श्री.सिमंतकर श्रीपाद(9834668027),रसूल पठाण(9764160180),दयानंद बिरादार(9028582999)यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार,धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील,मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे,आगारप्रमुख यशवंत कानतोंडे,लोकमत तालुका प्रतिनिधी व्ही.एस.कुलकर्णी,पत्रकार विनायक चाकुरे,डाॅ.उषा काळे,डाॅ.नारायण जाधव,डाॅ.मंगेश मुंढे,डाॅ.नामदेव बनसोडे,डॉ.नम्रता कोरे यांनी केले आहे.