भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,सामाजिक समता व परिवर्तनाचे महानायक,बोधीसत्व,विश्वभुषण, कायदेपंडित,ज्ञानयोगी,समाजातील शोषित-पीडित घटकाला न्याय-हक्क मिळवुन देणारे युगपुरुष,स्त्रीउद्धारक,प्रज्ञावंत, शिका-संघटित व्हा-संघर्ष करा ही संकल्पना मांडून तथा समता-बंधुता-न्याय यावर अढळ श्रद्धा ठेवून सर्वसमावेशक,विधायक व कृतिशील भुमिका घेऊन एकसंघ राष्ट्रनिर्माण व भारतीय स्वतंत्रता संग्रामात महत्वपूर्ण योगदान दिलेले महामानव भारतरत्न डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2021 रोजी धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील व प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बालाजी भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी डाॅ.डी.ए.भोसले,डाॅ.संजय बिरादार,डाॅ.मल्लिकार्जुन बिरादार,डॉ.सोनोने,डाॅ.निम्मलवार तथा सामान्य रुग्णालय व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉक्टर्स तथा कार्यालयीन व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.