दिनांक:-18 फेब्रुवारी ते 04 मार्च 2019 या कालावधीत सकाळी 08.30 ते दुपारी 02.30 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंती पंधरवडा निमित्ताने मोफत रोगनिदान व औषधोपचार-शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शिबीरामध्ये संधिवात,लकवा (पक्षाघात) आमवात व मणके दुखी, अम्लपित्त,मुळव्याध, भगंदर, मुतखडा,त्वचाविकार, मधुमेह,लठ्ठपणा,मासीकपाळी समस्या (रक्तप्रदर,श्वेतप्रदर), मुत्ररोग, हनिॅया,हायड्रोसिल, शिरःशुल, सदीॅ,नेत्ररोग व दातांच्या आजारावर मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. शिबीरामध्ये हिमोग्लोबीन व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी,रोगानुसार योग,आसन,प्राणायाम यांची माहिती-प्रात्यक्षिके आणि फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात  कफजविकारांवरील वमन चिकित्सा मोफत करण्यात येणार आहे.
या शिबिरात आणि शिबीर संपल्या नंतरही विशेषतः लकवा(पक्षाघात)या आजाराने पीडित रुग्णांनी त्याची माहिती दिल्यास त्यांना पंधरा दिवस ते एक महिना पर्यंत दररोज सकाळी त्यांच्या घरूनच काॅलेजच्या दवाखान्यात नेणे-आणणे करून अथवा दवाखान्यातच ठेवून विविध प्रकारच्या वातनाशक-बलदायी आयुवेॅदीक तेलाने त्यांच्या संपुर्ण शरीराचे स्नेहन(मसाज)व त्या नंतर स्वेदन आणि आवश्यक ते सर्व औषधोपचार निःशुल्क करण्यात येणार आहेत.
तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबीर संयोजक प्राचार्य डाॅ.दत्तात्रय वि.पाटील, डाॅ.उषा काळे,डाॅ.नारायण जाधव,डाॅ.मंगेश मुंढे,डाॅ.राजेंद्र धाटे,डाॅ.अवतारसिंग मिस्त्री,डाॅ.पुष्पा गवळे,डाॅ.रविंद्र गुणाले,डाॅ.नामदेव बनसोडे, डॉ.अविनाश जाधव,डाॅ.महेश धुमाळे,डाॅ.रश्मी चिद्रे,डाॅ.सचिन टाले,डाॅ.विष्णुकांत मुंढे; डाॅ.दिपीका सुरवसे; डाॅ.संजीवनी काडवदे; डाॅअमोल कुंभार;डाॅ.प्राजक्ता कुलकर्णी,डाॅ.ओम चिट्टे, डाॅ.प्राजक्ता जगताप यांनी केले आहे.