दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 01.30 ते 03.00 या दरम्यान धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल आणि पेडल टु गो यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उद्बोधक,मनाला भिडणारा व संवेदनशीलता वृद्धिंगत करणारा “कर्णबधिरांचे भावविश्व….. एक जिद्दीचा प्रवास” हा सौ. उमिॅला राजेंद्र आगरकर व कु.मानसी राजेंद्र आगरकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.