All Teaching Staff is requested to go through following PDF and positively note all the directions
Promotion-of-academic-integrity-and-prevention-of-plagiarism-in-AYUSH-educational-institutionGUIDELINES for AYURVEDA PRACTITIONERS for COVID-19
Download Link for Ayurveda Guidelines: https://www.ayush.gov.in/docs/ayurved-guidlines.pdf
Siddha Guidelines: https://www.ayush.gov.in/docs/siddha-guidelines.pdf
Unani Guidelines: https://www.ayush.gov.in/docs/unani-guidelines.pdf
CCIM Recommended Article – June 2020
All teaching staff are requested to take note of the following research article recommended by CCIM.
Title: Ayurvedic Preventive and Curative Protocol for COVID 19 – A Proposal
COVID-19 is an illness caused due to Novel Corona Virus 2, now called as Severe Acute Respiratory Syndrome Corona Virus -2 (SARS COV 2).[1] Ayurveda considers it as a JanapadodhwamsaVikara.[2]It can also be grouped under the class of BhutabhishangajaAagantuja Vikaara with special reference Aupasargika and Sankramika disease.[3]Furthermore, Bhuta in Ayurveda also has the meaning of Visha (poison)and virus meaninginlatinispoison. Here, the origin of the virus was earlier considered from animals (Bats – primary hosts, Snake – intermediate host and further Pangolins). According to AcharyaSushruta, all share the similar Yoni.[4] Considering all factors associated with Covid-19, the illness can be considered as a Sannipata Jwarawith predominance of Kapha and Pitta. Interestingly the signs and symptoms seen in this condition are quite similar to the Jangama Visha Lakshana of Kitavisha originating from Yoni of Jatuka (Bat), Sarpa (Snake), Shallaka (pangolin).[6]The choice of medicine (single and poly-herbo-mineral preparations) used should be Kapha Pittahara, Tridoshahara, Rakta Prasadaka / Shodhak, Agada (Vishahara), Jwarahara, Ashukaari, Bahukalpa Rasayana / Urjaskara (drugs having immune-boosting properties) and potent antimicrobial activities. Herbo-mineral agents possessing above activities which can be used as prophylactic as well as curative measure is been proposed in the study. Considering above concepts, a detailed review is done from Ayurvedic classics and a possible frame work is proposed in regard to Samprapti(pathogenesis), prophylactic and curative aspects of COVID-19 in the study.
Link to Article: https://www.jaims.in/index.php/jaims/article/view/1142/897
1142-1-2802-1-10-20200525NABH Webinar on AYUSH – Entry Level Standards
NABH Webinar on AYUSH – Entry Level Standards: Taking Quality to Our Roots | May 25, 2020 11:00 AM India
Courtesy: eQuest | QCI
International Yoga Day 2020 – Common Yoga Protocol Demonstration
International Yoga Day 2020 – Common Yoga Protocol Demonstration for Faculty, Staff, Internee Students and patients along with staff of General Hospital (Sub-District), Udgir was conducted during 15th June 2020 to 21st June 2020









आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त “योग – काळाची गरज” ह्या विषयावर व्याख्यान
International Yoga Day Lecture 2020 | Vd. Prasad Sanagar | Marathi
21st June 2020, at 10 am
Organized by
Department of Swasthavritta,
Dhanwantari Ayurved Medical College and Hospital, Udgir, Dist Latur
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, उदगीर द्वारे आयोजित करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक 21 जून 2020 रोजी सकाळी 10 वाजता “योग – काळाची गरज” ह्या विषयावर योगगुरू वैद्य प्रसाद सणगर (सहयोग योग अकादमी, कोल्हापूर) ह्यांचे सर्वांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. सर्वांनी ह्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा ही विनंती.
धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने वनौषधी लागवड
धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व वैयक्तिक अंतर राखून वनौषधी उद्यानामध्ये जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.18जुन2020 अतिरिक्त जिल्हाधिकारी डाॅ.अरविंद लोखंडे यांच्या शुभहस्ते औषधी लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मानद सदस्य रमेशअण्णा अंबरखाने,सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार,डाॅ.एस.आर.श्रीगिरे,डाॅ.आश्रुबा जाधव,डाॅ.स॔दीप मुसणे,डाॅ.सत्तारी,डाॅ.मनोहर सुयॆवंशी,डाॅ.मल्लिकार्जुन बिरादार हे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डाॅ.लोखंडे म्हणाले की वनौषधींची लागवड-संरक्षण-संवर्धन हे जैवविविधतेचे संतुलन स्वच्छ परिसर,हरीत परिसर व सुंदर परिसर संकल्पनेवर आधारित आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तुलसी,अडुळसा,अश्वगंधा,हरिद्रा यासारख्या विविध औषधी रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
यावेळी धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटलचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.




महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचा 22 वा वर्धापनदिन धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये उत्साहात साजरा
बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर,जि:- लातूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचा 22 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सामान्य(शासकीय) रुग्णालय,उदगीरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार हे उपस्थित होते.तर व्यासपीठावर डॉ.बालाजी कट्टेवार,डॉ.वैभव बिरादार, डॉ.नामदेव बनसोडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत सादर करुन ध्वजवंदन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ.दत्तात्रय पवार म्हणाले की कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध चिकित्सापद्धतीचे पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी विविध संसर्गजन्य आजार सोबतच वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत राहणे ही काळाची गरज असून त्याचा लाभ समाजाचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी निश्चितपणे होईल.
या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील म्हणाले की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचे आरोग्य क्षेत्रात अत्यंत मोलाचे व अतुलनीय योगदान आहे.अन्न-वस्त्र-निवारा या प्रत्येक व्यक्तीच्या व कुटुंबाच्या मूलभूत गरजा म्हणून गणल्या जातात त्याचप्रमाणे आता आरोग्यसेवा सुद्धा मूलभूत गरजा अंतर्गत घेऊन त्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.समाजातील प्रत्येक घटकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी, दक्षता व खबरदारी घेतानाच समाजाचे आरोग्य संतुलन टिकवून ठेवण्यासाठी कार्य केल्यास त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान सहज टाळता येऊ शकेल व पर्यायाने त्याचा राष्ट्रीय विकास दरांमध्ये वाढ होण्यासाठी लाभ होऊ शकेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय गुडसूरकर यांनी केले.
याप्रसंगी धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे व सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.



जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये वनौषधी लागवडीचा शुभारंभ
जागतिक पर्यावरण दिन 05 जून हा 1972 या वर्षापासून दरवर्षी साजरा केला जातो. बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व वैयक्तिक अंतर राखून वनौषधी उद्यानामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संस्थेचे सचिव आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते औषधी लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सामान्य(शासकीय-उपजिल्हा)रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध घोषवाक्य दिले जातात. जैवविविधतेचे संतुलन-संवर्धन ही काळाची गरज असुन निसर्गाची किमया सर्वांनी समजून घ्यायला हवी.स्वच्छ परिसर,हारीत परिसर व सुदर परिसर ही संकल्पना पूर्णत्वास यावी याकरिता सर्व घटकांनी योगदान अपेक्षित आहे तरच स्वस्थ व निरोगी व्यक्ती-समाज-राष्ट्र सहज शक्य आहे.वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे जेणेकरून आयुर्वेद शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या अश्वगंधा,शतावरी, गुडूची,यष्टिमधु,ब्राम्ही,पिंपळी,भल्लातक,हरीतकी ईत्यादी वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग करून रुग्ण बरे करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो आणि सद्यस्थितीतील कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याप्रसंगी डॉ. दत्तात्रय पवार यांना समयोचित मनोगत तर प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांनी समयोचित अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन द्रव्यगुण विभाग प्रमुख डॉ.एस.आर.श्रीगिरे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. वैभव बिरादार यांनी केले. यावेळी रोगनिदान विभागप्रमुख डॉ.नारायण जाधव,स्वस्थवृत्त विभागप्रमुख डॉ.अविनाश जाधव,अगदतंत्र विभागप्रमुख डाॅ.पंकज भांगे,सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संजय बिरादार,डाॅ.डी.ए.भोसले,डाॅ.संजय चिल्लरगे,डाॅ.प्रदीप सानप यांच्यासह धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.




