जागतिक पर्यावरण दिन 05 जून हा 1972 या वर्षापासून दरवर्षी साजरा केला जातो. बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व वैयक्तिक अंतर राखून वनौषधी उद्यानामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संस्थेचे सचिव आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते औषधी लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सामान्य(शासकीय-उपजिल्हा)रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध घोषवाक्य दिले जातात. जैवविविधतेचे संतुलन-संवर्धन ही काळाची गरज असुन निसर्गाची किमया सर्वांनी समजून घ्यायला हवी.स्वच्छ परिसर,हारीत परिसर व सुदर परिसर ही संकल्पना पूर्णत्वास यावी याकरिता सर्व घटकांनी योगदान अपेक्षित आहे तरच स्वस्थ व निरोगी व्यक्ती-समाज-राष्ट्र सहज शक्य आहे.वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे जेणेकरून आयुर्वेद शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या अश्वगंधा,शतावरी, गुडूची,यष्टिमधु,ब्राम्ही,पिंपळी,भल्लातक,हरीतकी ईत्यादी वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग करून रुग्ण बरे करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो आणि सद्यस्थितीतील कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याप्रसंगी डॉ. दत्तात्रय पवार यांना समयोचित मनोगत तर प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांनी समयोचित अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन द्रव्यगुण विभाग प्रमुख डॉ.एस.आर.श्रीगिरे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. वैभव बिरादार यांनी केले. यावेळी रोगनिदान विभागप्रमुख डॉ.नारायण जाधव,स्वस्थवृत्त विभागप्रमुख डॉ.अविनाश जाधव,अगदतंत्र विभागप्रमुख डाॅ.पंकज भांगे,सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संजय बिरादार,डाॅ.डी.ए.भोसले,डाॅ.संजय चिल्लरगे,डाॅ.प्रदीप सानप यांच्यासह धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

View this post on Instagram

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वनौषधी लागवडीचा शुभारंभ उदगीर(प्रतिनिधी):- जागतिक पर्यावरण दिन 05 जून हा 1972 या वर्षापासून दरवर्षी साजरा केला जातो. बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व वैयक्तिक अंतर राखून वनौषधी उद्यानामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संस्थेचे सचिव आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते औषधी लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सामान्य(शासकीय-उपजिल्हा)रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध घोषवाक्य दिले जातात. जैवविविधतेचे संतुलन-संवर्धन ही काळाची गरज असुन निसर्गाची किमया सर्वांनी समजून घ्यायला हवी.स्वच्छ परिसर,हारीत परिसर व सुदर परिसर ही संकल्पना पूर्णत्वास यावी याकरिता सर्व घटकांनी योगदान अपेक्षित आहे तरच स्वस्थ व निरोगी व्यक्ती-समाज-राष्ट्र सहज शक्य आहे.वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे जेणेकरून आयुर्वेद शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या अश्वगंधा,शतावरी, गुडूची,यष्टिमधु,ब्राम्ही,पिंपळी,भल्लातक,हरीतकी ईत्यादी वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग करून रुग्ण बरे करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो आणि सद्यस्थितीतील कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याप्रसंगी डॉ. दत्तात्रय पवार यांना समयोचित मनोगत तर प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांनी समयोचित अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन द्रव्यगुण विभाग प्रमुख डॉ.एस.आर.श्रीगिरे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. वैभव बिरादार यांनी केले. यावेळी रोगनिदान विभागप्रमुख डॉ.नारायण जाधव,स्वस्थवृत्त विभागप्रमुख डॉ.अविनाश जाधव,अगदतंत्र विभागप्रमुख डाॅ.पंकज भांगे,सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संजय बिरादार,डाॅ.डी.ए.भोसले,डाॅ.संजय चिल्लरगे,डाॅ.प्रदीप सानप यांच्यासह धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

A post shared by Dhanwantari Ayurved College (@damchudgir) on